अहवाल सादरीकरण
चैत्र शुध्द प्रतिपदेला विशेषतः महाराष्ट्रात अतिशय आनंदाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढी पाडवा. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यातही "उगाडी" ह्या नावाने हा सण साजरा केला जातो .साडे तीन मुहूर्तापैकी गुढी पाडवा हा सण मानला जातो.
वसंत ऋतू च आगमन ह्या दिवसापासून होत.झाडाला पालवी फुटून वसंत बहार बहरू लागतो.
शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून शालिवाहन संवत्सर चालू झाले.पौराणिक कथेनुसार भगवान राम युद्ध जिंकून वनवासामधून परत अयोध्येला आले तेव्हा तेथील गावकऱ्यांनी घराबाहेर गुढी उभारून त्यांचे स्वागत केले.
दोन वर्षाच्या lockdown नंतर आमच्याही जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि जन गन मन विद्यामंदिर शाळेत गुढी पाडवा साजरा करण्यात आला. मोठमोठ्या रांगोळ्य काढून शाळा व शाळे भोवतालचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.ह्यावेळी मोठ्या प्रमाणात शोभा यात्रा काढण्यात आली.सर्वच शिक्षकांनी आणि काही विद्यार्थ्यांनी ही ह्या शोभा यात्रेत हिरीरीने सहभाग दर्शवला होता.
ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही तर्फेला गुढ्या उभारुन सुशोभीकरण करण्यात आले होते.लेझिम ,गायन, नृत्य सादरीकरण झाले.
आमच्या शाळेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे सर, सचिव डॉ.सौ.प्रेरणा कोल्हे मॅडम, मुख्याध्यापक आदींनी ह्या शोभायात्रेत सहभाग दर्शवला होता.
आमच्या शाळेच्या संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या गायनाने ही शोभायात्रा जणू सोनियाचा दीन च ठरला होता.
अहवाल लेखन.
सौ. श्रेया कुलकर्णी.
Developed By Sanmisha Technologies